Please wait...

Marathi Test - 7
Result
Marathi Test - 7
  • /

    Score
  • -

    Rank
Time Taken: -
  • Question 1/10
    5 / -1

    गुणहीन शब्दातील समास सांगा. 
    Solutions

    तत्पुरुष समास- या समासातील दुसरे पद प्रधान असते व शब्दाचा विग्रह करतांना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय घ्यावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.


    विभक्ती तत्पुरुष समास- या समासात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप झालेला दिसतो. सामासिक शब्द तयार होतांना ज्या विभक्ती प्रत्यय चा लोप झालेला असतो त्या विभक्तीचे नाव त्या समासाला प्राप्त होते.
    द्वितीया तत्पुरुष
    तृतीया तत्पुरुष
    चतुर्थी तत्पुरुष
    पंचमी तत्पुरुष
    षष्ठी तत्पुरुष
    सप्तमी तत्पुरुष
    गुणहीन या शब्दात तृतीया तत्पुरुष समास आहे. त्याचा विग्रह गुणाने हीन असा होईल आणि ने हा प्रत्यय तृतीया विभक्तीचा आहे.

  • Question 2/10
    5 / -1

    श्यामशरण या शब्दातील समास ओळखा.
    Solutions

    तत्पुरुष समास- या समासातील दुसरे पद प्रधान असते व शब्दाचा विग्रह करतांना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय घ्यावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.


    विभक्ती तत्पुरुष समास- या समासात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप झालेला दिसतो. सामासिक शब्द तयार होतांना ज्या विभक्ती प्रत्यय चा लोप झालेला असतो त्या विभक्तीचे नाव त्या समासाला प्राप्त होते.
    द्वितीया तत्पुरुष
    तृतीया तत्पुरुष
    चतुर्थी तत्पुरुष
    पंचमी तत्पुरुष
    षष्ठी तत्पुरुष
    सप्तमी तत्पुरुष

    श्यामशरण या शब्दात द्वितीया तत्पुरुष समास आहे. कारण त्याचा विग्रह 'श्यामला शरण' असे होईल. आणि अर्थानुसार ला हा प्रत्यय द्वितीयेमध्ये असतो. त्यामुळे वरील पर्यायांपैकी तत्पुरुष समास हा पर्याय योग्य आहे.

  • Question 3/10
    5 / -1

    ‘भीमार्जुन’ या द्वंद्व समासाची फोड सांगा - 
    Solutions
    उत्तर व स्पष्टीकरण - भीम आणि अर्जुन
    • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द(पदे) जोडुन जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. 
    • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो.  
    • उदा.
    • दररोज – प्रत्येक दिवशी 
    • देवदूत – देवांचा दूत 
    • समासाचा विग्रह – एखादा सामासिक शब्द ज्या शब्दांपासून बनतो त्यांचा परस्पर संबंध हे विशद करून दाखवणे म्हणजेच समासाचा विग्रह करणे होय. 
    • या समाजाची दोन्ही पदे महत्त्वाची असतात या समाजाचे तीन प्रकार असतात इतरेतर द्वंद्व,वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे. 
    • इतरेतर द्वंद्व - या सामासिक शब्दाचा विग्रह करताना व आणि या समुच्चय बोधक अव्यय यांचा उपयोग करावा लागतो. 
    • उदा. आईवडील - आई आणि वडील
    • भीमार्जुन - भीम आणि अर्जुन
  • Question 4/10
    5 / -1

    द्वंद्व समास म्हणजे काय? 
    Solutions

    उत्तर व स्पष्टीकरण – ज्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असतात.

    • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द(पदे) जोडुन जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. 
    • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. 
    • उदा.
    • दररोज – प्रत्येक दिवशी 
    • देवदूत – देवांचा दूत 
    • समासाचा विग्रह – एखादा सामासिक शब्द ज्या शब्दांपासून बनतो त्यांचा परस्पर संबंध हे विशद करून दाखवणे म्हणजेच समासाचा विग्रह करणे होय.
    • या समाजाची दोन्ही पदे महत्त्वाची असतात या समाजाचे तीन प्रकार असतात इतरेतर द्वंद्व,वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे. 
    • इतरेतर द्वंद्व 
    • या सामासिक शब्दाचा विग्रह करताना व आणि या समुच्चय बोधक अव्यय यांचा उपयोग करावा लागतो. 
    • उदा. आईवडील - आई आणि वडील
    • भिमार्जुन - भीम आणि अर्जुन
    • राम-लक्ष्मण,हरिहर ,स्त्री-पुरुष,विटी-दांडू,बहिण-भाऊ, लिहू वाचू इत्यादी या समाजाची आणखी काही उदाहरणे आहेत. 
    • वैकल्पिक द्वंद्व - या सामाजिक शब्दाचा विग्रह करताना वा, अथवा किंवा अशा बोधक अव्ययाने केला जातो यास वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात.
    • उदा.खरेखोटे - खरे किंवा खोटे 
    • पास-नापास - पास किंवा नापास 
    • आजउद्या - आज किंवा उद्या 
    • पापपुण्य - पाप आणि पुण्य 
    • इत्यादी या समाजाची उदाहरणे सांगता येतील.
    • समाहार द्वन्द्व समास -  ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवय त्याच प्रकारच्या आणखी काही पदाचाही समावेश आहे असे दर्शविले जाते त्यास समाहार द्वन्द्व समास म्हणतात. 
    • उदा.चहापाणी चहापाणी आणि इतर उपहाराचे पदार्थ 
    • भाजी भाकरी भाजी भाकरी आणि त्या प्रकारचे पदार्थ 
    • केरकचरा, मीठभाकर, अंथरूण-पांघरूण, नवससायास, घरदार, चटणीभाकर ही या समाजाची आणखी काही उदाहरणे सांगता येतील.

     

  • Question 5/10
    5 / -1

    महापंडित या शब्दात कोणता समास आहे?
    Solutions
    कर्मधारय समास- ज्या सामासिक शब्दामधील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. या समासातील दोन पदांमध्ये विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय असा संबंध  असतो. दोन्ही पदांची प्रथमा विभक्ती विग्रहाची प्रथमाच असते.
    उदा. 
    1. महापंडित- महान असा पंडित
    2. महादेव- महान असा देव
    3. रक्तचंदन- रक्तासारखे चंदन
    अशाप्रकारे महापंडित या शब्दात कर्मधारय समास आहे.
  • Question 6/10
    5 / -1

    ‘लोकसेवा’ या तत्पुरुष समासाची फोड सांगा - 
    Solutions

    उत्तर व स्पष्टीकरण - लोकांची सेवा

    • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द(पदे) जोडुन जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. 
    • जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. 
    • उदा.
    • दररोज – प्रत्येक दिवशी 
    • देवदूत – देवांचा दूत 
    • समासाचा विग्रह – एखादा सामासिक शब्द ज्या शब्दांपासून बनतो त्यांचा परस्पर संबंध हे विशद करून दाखवणे म्हणजेच समासाचा विग्रह करणे होय. 
    • तत्पुरुष समास 
    • या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. या समासामध्ये विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करताना घालावा लागतो. 
    • समानाधिकरण तत्पुरुष समास - कधीकधी तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, तेव्हा त्यास समानाधिकरण तत्पुरुष समास म्हणतात. 
    • या समासाचा विग्रह करताना एका पदाशी दुसऱ्या पदाचा असलेला संबंध विभक्तीप्रत्ययाने दाखविला जातो त्याच विभक्तीचे नाव समासाला दिले जाते. 
    • उदा. 
    • कलाकुशल - कलेत कुशल
    • युद्धकाळ - युद्धाचा काळ
    • ईश्वरनिर्मित - ईश्वराने निर्मित
    • क्रीडांगण -  क्रीडेसाठी अंगण
    • भयमुक्त - भयापासून मुक्त
    • देवघर - देवांसाठी घर
    • शाखाविस्तार - शाखांचा विस्तार
    • भक्तीवश - भक्तीने वश
    • देवदूत - देवांचा दूत
    • मतिमंद - मतीने (बुद्धीने) मंद
    • कूपमंडूक - कूपातील मंडूक
    • सेवानिवृत्त - सेवेतून निवृत्त
    • पूजाद्रव्य - पूजेसाठी द्रव्य

     

  • Question 7/10
    5 / -1

    नीलकंठ हा कोणत्या समासाचा असु शकतो?
    Solutions

    बहुव्रीही समास- बहुव्रीही या  समासातील दोन्ही पदे अर्थात पूर्वपद आणि उत्तरपद दोन्ही महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

    नीलकंठ- हा सामासिक शब्द आहे. 'निळा आहे कंठ ज्याचा असा' त्याचा विग्रह करता येईल.

    येथे विशेषण-विशेष्य असा संबंध असल्यामुळे कर्मधारय समास होईल परंतु निळा असा कंठ म्हणजे गळा याबद्दल बोलायचे नसून त्यातून शंकर देव असे सुचवायचे आहे. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो. 

    अशाप्रकारे नीलकंठ हा बहुव्रीही समास आहे.

  • Question 8/10
    5 / -1

    यथाक्रम शब्दातील समास ओळखा.
    Solutions
    अव्ययीभाव समास- या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दांचा वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे उपयोग करता येतो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
    उदा-
    1. यथाशक्ती- शक्ती प्रमाणे
    2. आजीवन- जीवनभर 
    3. आमरण- मरेपर्यंत
    4. प्रतिक्षण- प्रत्येक क्षणाला

     

    अशाचप्रकारे यथाक्रम- क्रमाप्रमाणे या शब्दात देखील अव्ययीभाव समास आहे.
  • Question 9/10
    5 / -1

    दशानन ह्या बहुव्रीही समासाची फोड सांगा - 
    Solutions
    उत्तर व स्पष्टीकरण - दहा आहेत आनने ज्याला असा

    समास-

    सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द (पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. 

    जेव्हा असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. 

    उदा.

    • दररोज– प्रत्येक दिवशी 
    • देवदूत– देवांचा दूत 

    बहुव्रीही समास-

    ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसतात किंवा दोन्ही पदे मिळून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा त्या सामासास बहुव्रीही समास असे म्हणतात.

    उदा.

    • दशानन - दहा आहेत आनने तोंडे ज्याला असा तो. 
    • नीलकंठ - निळा आहे कंठ ज्याचा असा तो.
  • Question 10/10
    5 / -1

    ‘सेनानिवृत्त’ या शब्दातील समास कोणता?
    Solutions

    सामासिक शब्द: सेनानिवृत्त
    विग्रह: सेनेतून निवृत्त
    समास:पंचमी तत्पुरुष समास

    Important Pointsतत्पुरुष समास: 

    • ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करतांना घालावा लागतो, त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
    • द्वितीया तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष और सप्तमी तत्पुरुष हे तत्पुरुष समासाचे भेद आहेत.

    पंचमी तत्पुरुष समास:

    • विभक्ती तत्पुरुष समासांचा विग्रह करत असताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते.
    • पंचमी विभक्तीचा कारक अपादान असून त्याचे कारकार्थ ऊन, हून, तून हे आहेत.


    आणखी उदाहरणे: ऋणमुक्त, जातिभ्रष्ट इ. 
    अशाप्रकारे ‘सेनानिवृत्त’ या शब्दातील समास पंचमी तत्पुरुष समास आहे.

User Profile
-

Correct (-)

Wrong (-)

Skipped (-)


  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Click on Allow to receive notifications
×
Open Now